नांदेड / मुदखेड – मुदखेड तालुक्यातील वासरी आणि शंखतीर्थ येथील गोदावरी नदीतून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करणाऱ्या एकूण ५ बोटी, १ इंजन, २ तराफे आणि एक मोठी बोट (फायबर) जिलेटीन च्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आल्या. ही कार्यवाही नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि नांदेड पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मुदखेड चे तहसीलदार आनंद देऊळगावकर आणि पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या पथकाने दि. ६ नोव्हेंबर रोजी धडक कारवाई केली. या संयुक्त कारवाईत अवैध रेतीची उत्खनन आणि उपसा करणाऱ्या रेती माफियांना जबरदस्त धक्का बसला आहे.
सविस्तर वृत्त असे की महसूल आणि पोलीस विभागाला अवैध रित्या रेतीची उत्खनन आणि उपसा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि दोन्ही विभागाने संयुक्त पथक स्थापन करत कार्यवाही केली या कार्यवाहीत रेतीची उत्खनन करण्यात येणारे साहित्य एकूण ५ बोट, १ इंजन, २ तराफे आणि एक मोठी बोट (फायबर) जिलेटीन च्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आल्या.
सदर कार्यवाहीत नायब तहसीलदार मारोतराव जगताप, विश्वनाथ बोधमवाड, बाबुराव मुळेकर, राजू चव्हाण, गंगाधर मोरे, शेषराव कोटूरवार, राजकुमार मस्के, गोपाल माने, मनोज वाघमारे सर्व ग्राम महसूल अधिकारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अंगद कदम, पोह-कवठेकर, पोकॉ रंजीत वानोळे, पोकॉ- संदीप कारामुंगे, पोकॉ अरविंद सिंगारपुतळे, पोकॉ गणपत बोरकर, महसूल सेवक,सुल्तान पठाण, कोकणे, पोलीस पाटील प्रताप पवार, टील, शुभांगी येडे व भावेश्वर मुंगल हे उपस्थित होतेे.

















