मुदखेड / नांदेड – मुदखेड तालुक्यातील मुगट परिसरात दि.२६ डिसेंबर रोजी मुगट पासून माता साहेब गुरुद्वारा लगत ब्राम्हणवाडाकडे जाणारे शिवारात मातासाब गुरुद्वारा लगत मुगट ते ब्राम्हणवाडा जाणारे रस्त्यालगत गोदावरी नदीपात्रातुन अवैध वाळू उपसा केलेला सबंधीत मुद्देमाल १४,१७,०००/- रुपयाचा मिळून आला आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस कर्मचारी करत असून मुदखेड तालुक्यात अवैध रित्या रेतीचा उत्खनन आणि वाहतूक करणे सध्या नित्याचाच झाल्याचं दिसत असून नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार , अपर पोलीस अधिक्षक भोकर श्रीमती अर्चना पाटील , नांदेड चे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली मुदखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धिरज दत्तात्रय चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर संबंधित आरोपींवर कारवाई करून एक टिप्पर किंमत ४,०५,०००-००एम एच-२२- २७३९, एक TATA HITACHI किंमत १०,००,०००-००कंपनीची पोकलेन मशीन १२,०००-००अंदाजे पाच ते सहा ब्रास साठवणुक केलेली वाळु असा असून
एकुण- १४,१७,०००/- चा मुद्देमाल जप्त करत विठल जळबाजी दुधमल रा. ब्राम्हणवाडा ता.जि. नांदेड. देवानंद विठल दुधमल रा. ब्राम्हणवाडा ता. जि. नांदेड यांच्या विरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात २३७/२०२५ कलम ३०३(२),३(५) भा. न्या.सं. सह महाराष्ट्र महसुल अधिनियम १९६६कलम ४८(७),४८(८) असा गुन्हा नोंदविण्यात आला असून अवैध रेतीची उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणलेले आहेत.
सदरील कार्यवाहीत पोलीस स्टेशनच्या पथकात पोलीस अंमलदार कवठेकर, पोलीस कॉन्स्टेबल कारामुंगे आणि पोलीस कॉन्स्टेबल पुणेबोईनवाड सह महसूल पथकाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते

























