बळीराम जगताप
वाशी धाराशिव
९४२१३५२७३८
वाशी तालुक्यातील महसूल कर्मचारी १५ जुलै पासून बेमुदत संपावर!
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्या संदर्भात शासन स्तरावरून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आंदोलनाच्या भूमिकेबाबत शासनास बेमुदत संपाची नोटीस देण्यात यावी त्यानुसार खालील प्रमाणे आंदोलनाची टप्पे ठरवल्या प्रमाणे आंदोलन चालू आहे.१० जुलै काळ्या पिठी लावून काम करणे ११ जुलै रोजी जेवण्याच्या सुट्टीमध्ये कार्यालयाच्या गेटवर निदर्शन करणे १२ जुलै रोजी लेखणी बंद आंदोलन व १५ जुलै पासून बेमुदत काम बंद आंदोलन चालू आहे.
वरील प्रमाणे जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी संपात सहभागी असून संघटनेच्या आदेशानुसार वाशी तहसील मधील कर्मचारी संपात सहभागी असल्याचे दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे अनेक लोकांना तहसील कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहे. तहसील मधील अनेक लोकांची प्रमाणपत्राची मागणी असल्याने दररोज फेऱ्या माराव्या लागत आहे.
त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झालेल्या आहेत. तरी शासनाने सदरील कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्वरित विचार करून व त्यांच्या मागण्या मान्य करून जनतेला न्याय द्यावा अशा प्रकारची मागणी नागरिक मोठ्या संख्येने करीत आहेत.