तभा फ्लॅश न्यूज/जाफराबाद : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या संस्थेचा १४ वा वर्धापन दिन ११.११.२०२५ रोजी आहे. या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील ३६ जिल्हे व 14 महानगरपालिका मध्ये संत मुक्ताई, जनाई, बहिणाई हरिपाठ मंडळांच्या हरिपाठ स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या निमित्ताने त्याच्या नियोजनाची बैठक आज येथे दिनांक 2/8/2025 रोजी घाडगे कॉम्प्लेक्स जालना रोड जाफराबाद येथे संपन्न झाली.
वारकरी साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त हरिपाठ स्पर्धांचे जे आयोजन करण्याचे ठरले आहे. हरिपाठ स्पर्धेमध्ये एक ते पाच नंबर येणाऱ्या तसेच विशेष पुरस्कार मिळवणाऱ्या मंडळाला तीर्थक्षेत्र भेट बक्षीस रूपात देण्यात येणार आहे.प्रथम क्रमांकास ऋषिकेश हरिद्वार, द्वितीय क्रमांकस कन्याकुमारी, तृतीय क्रमांकास जगन्नाथ पुरी, चतुर्थ क्रमांकास बालाजी, पाचव्या क्रमांकास अमृतसर, व विशेष पुरस्कार जयपुर राजस्थान अशी माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह. भ. प. विठ्ठल पाटील (काकाजी) यांनी दिली. त्यांच्या नियोजनानुसार राज्यातील ३६ जिल्ह्यामध्ये संत मुक्ताई, जनाई, बहिणाई हरिपाठ मंडळाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज जालना जिल्ह्याची संत मुक्ताई, जनाई, बहिणाई हरिपाठ मंडळांची आढावा बैठक घाडगे कॉम्प्लेक्स जालना रोड जाफराबाद येथे घेण्यात आली.
यावेळी जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ह. भ.प. विलास बापू देशमुख , ह.भ.प. मार्तंड महाराज फदाट ( तालुकाध्यक्ष जाफराबाद ) ह भ प सुभाष महाराज शेळके, तुकाराम महाराज शिरसाट, अमोल महाराज देवडे, , अमोल पाटील उगले आबा पाटील जाधव गजानन घुसिंगे फराट, ह भ प एकनाथ महाराज घाडगे,तात्यासाहेब शिरसाट, कृष्णा महाराज खांडेभराड ,देविदास महाराज कळंबे संघटक जाफराबाद,जिल्ह्यातील सर्व महिला व पुरुष , वारकरी उपस्थित होते. जिल्हा संपर्कप्रमुख श्री रामेश्वर जराड सर, श्री. प्रशांत भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीची सांगता पसायदानाने करण्यात आली.