मंगळवेढा – शासनाचे नियमानुसार नोव्हेंबर २०२५ चे पहिल्या आठवडयात साखर कारखाने सुरु झाल्याने ऊसाने भरलेली वाहने रात्री अपरात्री रत्यावरुन जाताना सुरक्षीततेच्या नियमाचे पालन करणेसाठी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांचे आदेशानुसार व सोलापूर जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांचे मार्गदर्शनाखाली संत दामाजी साखर कारखाना कार्यस्थळावर रस्ते वाहतुक सुरक्षा अभियान राबविणेत आले.
सदर प्रसंगी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर राजेश रणदिवे, पोलीस काùन्स्टेबल श्रीकांत दुधाळ,पोलीस हवालदार तानाजी मुदगूल, प्रशांत सुर्यवंशी यांचे उपस्थितीत टù्रक्टर, बैलगाडी या वाहनांचे पाठीमागील बाजुस रिप‹लेक्टर लावणेचा कार्यक्रम राबविणेत आला।
सदर प्रसंगी वाहतूक शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर राजेश रणदिवे यांनी उपस्थित वाहन चालक मालक यांना मार्गदर्शन करताना सांगीतले कि,अपघात टाळणेसाठी सुरक्षिततेच्यादृष्टीने ऊस वाहतुकीचे वाहनावर पाठीमागे नमुन्यातील ४x४ फुटाचे रिप‹लेक्टर बोर्ड लावणे बंधनकारक असुन मोठया आवाजात टेपरेकाùर्डर लावू नये, ओव्हरलोड वाहतुक करु नये, ऊसाने भरलेली अवजड वाहने पुढे नेण्यासाठी स्पर्धा करु नये। रस्त्यावर नादुरुस्त झालेले वाहन दुरुस्त केल्यानंतर लावलेले दगड, उटी रस्त्यावरुन बाजुला काढावी। रिकामे वाहन निष्काळजीपणे व भरघाव वेगात चालवू नये.
ट्रेलर,ट्रकचे बाहेरपर्यंत ऊस भरु नये। भरलेल्या किंवा रिकाम्या ट्रùक्टरला दोन पेक्षा अधिक ट्रेलर जोडू नयेत। ऊस वाहतुक करणा-या वाहनाच्या पाठीमागे एक लाल रंगाचा दिवा रात्रीचेवेळी लावावा। ऊस वाहतुकीचे वाहनाच्या दोन्ही बाजूस रिप‹लेक्टर पटटया लावाव्यात जेणेकरुन दोन्ही बाजूने वाहन दिसेल अशा मार्गदर्शक सुचना दिल्या।
कारखान्याचे चेअरमन श्री।शिवानंद पाटील, व्हा।चेअरमन श्री।तानाजीभाऊ खरात व संचालक मंडळाचे मार्गदर्शनानुसार कारखान्याकडे ऊस तोडणी वाहतुकीसाठी मोठया प्रमाणात वाहतुक यंत्रणा उपलब्ध झालेली आहे। कारखान्यामार्फत ट्रक,ट्रùक्टर,बैलगाडी,डंपिंग ट्रùक्टरकरिता रिप‹लेक्टर तयार करुन संबंधीत वाहन धारकांना दिलेले आहेत। तसेच जिल्हा वाहतुक नियंत्रण कक्ष यांच्या नियमांचे पालन करुन अपघात होवु नयेत याची काळजी घ्यावी असे आवाहन सदर प्रसंगी कार्यकारी संचालक श्री रमेश जायभाय यांनी केले।
सदर प्रसंगी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी कृष्णात ठवरे, चिफ इंजिनिअर सुखदेव औताडे, चिफ अकौंटंट रमेश गणेशकर, कार्यालय अधिक्षक दगडु फटे, पर्चेस आùफिसर संदिप इंगोले, स्टोअर किपर उत्तम भुसे, हेड टाईम किपर आप्पासो शिनगारे, केनयार्ड सुपरवायझर प्रकाश पाटील, सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे, वाहन मालक नितीन वाघमोडे,मारुती पाटील, सुनिल जाधव, चांगदेव लवटे, समाधान जाधव, सोमनाथ पाटील, अर्जून घोडके, तसेच वाहन चालक विनायक मेटकरी, अमोगसिध्द् पुजारी, मच्छिंद्र साखरे, आप्पा गर्जे, आवळेकर व कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते।

















