सांगोला – तालुक्यातील कडलास येथील जि.प.प्रा.शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने शाळकरी मुले व पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या कडलास येथील युवकांनी योगेश खटकाळे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तात्काळ दखल घेत संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या. त्यांच्या आदेशानुसार रस्त्याची दुरुस्ती करून देण्यात आली. सदर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे शाळेत ये-जा करणाऱ्या लहान मुलांना व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ग्रामस्थांनी या तातडीच्या आणि प्रभावी कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. माजी आ.शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या प्रश्नांवर त्वरित उपाययोजना करण्याची जी परंपरा आहे, त्याच परंपरेनुसार हे काम पूर्ण करून देण्यात आले असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. तसेच येथे निसर्ग संवर्धनासाठी मान्यवरांच्या आर्थिक सहभागातून वृक्षारोपण करण्यात आले.

















