Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इंद्रभुवनशी जुळलेली आठवण; सूक्ष्म निरीक्षण, वारशाविषयी जिव्हाळा

तरुण भारतbyतरुण भारत
January 29, 2026
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या दुःखद वृत्ताने संपूर्ण राज्य हादरले आहे. कर्तव्यदक्ष, स्पष्टवक्ते आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असताना, सोलापूर महानगरपालिकेच्या आवारातील ऐतिहासिक इंद्रभुवन इमारतीशी जोडलेल्या त्यांच्या आठवणी आज हृदयाला चटका लावणाऱ्या ठरत आहेत.

          शनिवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२४… दुपारची वेळ. सोलापूर महापालिका आवारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नेहमीप्रमाणेच ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण एन्ट्री झाली होती. तत्कालीन महापालिका आयुक्त शीतल तेली–उगले यांनी त्यांचे स्वागत केले होते. इंद्रभुवन इमारतीतील मीटिंग हॉलमध्ये झालेल्या बैठकीत अजितदादांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. स्क्रीनवर सुरू असलेली सादरीकरणे बारकाईने पाहत, प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी प्रश्न विचारले, सूचना केल्या. यानंतर त्यांनी सोलापूरच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देणाऱ्या इंद्रभुवन इमारतीची चारही बाजूंनी प्रत्यक्ष पाहणी केली. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या नूतनीकरणाकडे त्यांनी अत्यंत सूक्ष्म नजरेने लक्ष दिले. कुठेही मूळ वास्तुशैलीला धक्का बसू नये, याबाबत त्यांनी विशेष आग्रह धरला. काही लहानसहान त्रुटी निदर्शनास आणून देत, त्या दुरुस्त करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या.

          “ इंद्रभूवन ही केवळ इमारत नाही, हा सोलापूरचा इतिहास आहे”  अशा शब्दांत त्यांनी इंद्रभुवनच्या वारशाविषयीचा आपुलकीचा भाव व्यक्त केला होता. नूतनीकरणाचे काम अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी महापालिकेच्या कामाचे मनापासून कौतुक केले होते. त्यावेळी आयुक्त शीतल तेली–उगले यांनी उपमुख्यमंत्री यांना इंद्रभुवन इमारतीच्या नूतनीकरणाची सविस्तर माहिती दिली होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतर ऐतिहासिक वारसा लाभलेली सोलापूर महापालिका ही राज्यातील एकमेव महानगरपालिका असल्याचे त्यांनी सांगितले होते. मूळ सौंदर्य अबाधित ठेवूनच हे नूतनीकरण करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

        या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त आशिष लोकरे, तत्कालीन उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, माजी आमदार दीपक साळुंखे–पाटील, माजी गटनेते किसन जाधव, नगर अभियंता सारिका आकूलवार, उपअभियंता युसुफ मुजावर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

“मूळ सौंदर्य जपा” सांगणारा तो आवाज

 कायमचा शांत झाला…

         आज, त्याच इंद्रभुवनच्या दगडी भिंती, कमानी आणि ऐतिहासिक वास्तूत अजितदादा पवार यांच्या त्या भेटीच्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. विकासाबरोबरच वारशाची जपणूक करणारा संवेदनशील नेता आज काळाच्या पडद्याआड गेला आहे, ही जाणीव सोलापूरकरांच्या मनात शोकभावना दाटून आणत आहेत.

इंद्रभुवन आजही उभे आहे… पण त्याकडे कलात्मक दृष्टीने  पाहणारी ती नजर, सूक्ष्म निरीक्षण करणारा तो अनुभव,

आणि “मूळ सौंदर्य जपा” सांगणारा तो आवाज

आज कायमचा शांत झाला आहे…अशा भावना व्यक्त होत आहेत.

अजितदादांकडे विकास अन्   कलात्मक दूरदृष्टी होती : उपायुक्त लोकरे 

इंद्रभुवन वास्तूच्या पाहणी वेळीच्या आठवणी सांगताना महापालिका उपायुक्त आशिष लोकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोलापूर महापालिका आवारातील इंद्रभुवन या वास्तूची सूक्ष्म पाहणी केली होती. पूर्ण निरीक्षण केले होते. उत्कृष्ट वास्तू कशी असावी ? यांची अभ्यासपूर्ण माहिती अजितदादांना होती. त्याच माध्यमातून त्यांनी इंद्रभुवन वास्तू नूतनीकरणातील काही त्रुटीही सुचित केल्या होत्या. विविध विकास कामांचा आढावा घेत असतानाच त्यावेळी त्यांनी निधीची गरज असेल तर कधीही सांगा, मी मागे पडणार नाही. सोलापूर शहरातील विकास कामे मार्गी लागली पाहिजेत. उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करा. सोलापूर शहराला पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा. अशा स्पष्ट सूचनाही अजितदादांनी त्यावेळी दिल्या होत्या, अशी भावनिक आठवणही उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितली.

Post Views: 41
Previous Post

सर्वात अधिकवेळा अजितदादांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषविले

Next Post

योगेश खटकाळे यांच्या प्रयत्नातून कडलास येथे रस्त्याचे काम पूर्ण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

योगेश खटकाळे यांच्या प्रयत्नातून कडलास येथे रस्त्याचे काम पूर्ण

ताज्या बातम्या

शिवसेनेचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांना केले एक दिवसाचे निलंबित

April 20, 2026

सोलापूरच्या खेळाडूंना प्रिसिजनचे बळ

April 20, 2026

दहिगावच्या सुरडकर कुटुंबाची पाचवी पिढी जपत आहे ही परंपरा

April 20, 2026

सुखी जीवनासाठी संयम हीच खरी गुरुकिल्ली – मुनीश्री वीरसागर महाराज

April 20, 2026

मंठा येथे माझं गाव आरोग्य संपन्न गाव कार्यशाळा संपन्न

April 20, 2026

विचार नसलेल्या व्यक्ती समाज माध्यमात व्यक्त होत असल्याने सामाजिक प्रदूषण वाढले – प्रा. कळमकर

April 20, 2026

शिवसेनेचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांना केले एक दिवसाचे निलंबित

April 20, 2026

लिंगायत स्मशानभूमी आणि पाणीपुरवठा योजनेबाबत पहा काय म्हणाले पालकमंत्री गोरे #public #marathinews

April 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0821723

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697