अक्कलकोट – केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत यश संपादन करून भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (IRMS), वर्ग–1 अधिकारी म्हणून निवड झालेल्या कु. रोहिणी इरांणा उणदे यांचा तोरस्कर परिवार आणि रोटरी क्लब अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने आज एका भव्य समारंभात सत्कार करण्यात आला. रोहिणी यांच्या उल्लेखनीय यशामुळे अक्कलकोट शहरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
कार्यक्रमास रोटेरियन केदार नरोणे, जितेंद्र जाजू, सौ. सोनल जाजू, अॅड. सुनील बोराळकर, सागर हलगोदे, डॉ. विपुल शहा, डॉ. प्रशांत वाली, प्रदीप तोरस्कर, सौ. मिलन तोरस्कर यांसह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान श्री. जितेंद्र जाजू यांनी कु. रोहिणी उणदे यांची विशेष मुलाखत घेऊन त्यांच्या UPSC प्रवासातील अडचणी, अभ्यास पद्धती आणि प्रेरणादायी अनुभवांबद्दल संवाद साधला. उपस्थितांनी मोठ्या उत्सुकतेने त्यांची उत्तरे ऐकली.
सत्कार सोहळ्यात सर्व अक्कलकोट रोटेरियन आणि उपस्थित मान्यवरांनी कु. रोहिणी उणदे यांना भावी सेवाकार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी रोहिणी यांच्या मातोश्री उणदे तसेच मामाश्री नरूणे हेही उपस्थित होते. त्यांच्या पाठिंबा आणि प्रोत्साहनामुळे रोहिणी यांनी हे यश मिळवल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
















