तभा फ्लॅश न्यूज/अकलूज : रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीला अकलूज येथे झालेल्या जिल्हा सदस्यता सेमिनारमध्ये सदस्यवाढीसाठी सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी क्लबचे अध्यक्ष रोटे. अकबरसाहेब नदाफ, सदस्य रोटे. भारत कदम, रोटे. तौफिक काझी, रोटे. महेश साळुंके तसेच जिल्हा सचिव राजगोपाल तापडिया, वीरेंद्र फुंडीपल्ले व जिल्हा सदस्यता संचालक सीए नितीन कुदळे उपस्थित होते.
हा सन्मान सर्व सदस्यांच्या एकत्रित परिश्रमांचे फलित आहे. या यशामुळे आम्हाला पुढील काळात समाजसेवा, मैत्रीभाव आणि नेतृत्व विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे, असे अध्यक्ष रोट. अकबरसाहेब नदाफ सांगितले.
या यशामुळे रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीने रोटरीचे कार्यक्षेत्र वाढवून नवीन सदस्य जोडण्यात व समाजसेवेचे व्रत पाळण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. “सेवा हीच श्रेष्ठ” या तत्त्वाशी बांधिलकी जपत क्लबने केलेल्या उपक्रमांची जिल्हास्तरावर दखल घेण्यात आली.