वेळापूर – पोलीस स्टेशनच्या वतीने वेळापूर शहरातून गुन्हेगारावर वचक बसवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी जयंती/ उत्सव निमित्त शांतता टिकून रहावी यासाठी वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष कांबळे यांच्या वतिने पोलीस कर्मचारी यांच्यासमवेत गुरुवारी सायंकाळी वेळापूर शहरातून रूट मार्च काढण्यात आला.
नागरिकांना आगामी उत्सव जयंती / उत्सव शांततेत व सामाजिक सलोखा ठेवून साजरी करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर आक्षेपार्ह धार्मिक व सामाजिक सलोखां बिघडेल अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या वर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या”!
यावेळी प्रभारी अधिकारी आशिष कांबळे म्हणाले की वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमध्ये शांतता रहावी कायद्याचे सर्वांनी पालन करावे जो कायद्याच्या विरोधात जाईल किंवा कायदा मोडेल त्यांच्यावर कायदेशीर गंभीर गुन्हे दाखल केले जातील असे सांगितले
सदरच्या रूट मार्चला वेळापूर पोलीस स्टेशन येथून सुरुवात होऊन पालखी चौक , वेळापूर एसटी स्टँड, फुले शाहू आंबेडकर नगर , व्यापार पेठ, तलाठी कार्यालय वेळापूर, ग्रामपंचायत कार्यालय येथून निघून वेळापूर पोलीस स्टेशन येथे रूट मार्चची सांगता झाली.

























