नांदेड / माहूर – ज्येष्ठ भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वातंत्र्यानंतर, भारताच्या संस्थानांचे एकत्रीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असे भारताचे ‘लोह पुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त माहूर पोलीस ठाण्याच्या वतीने वसंतराव नाईक चौक ते बस स्थानक पर्यंतच्या रस्त्यावरुन ‘रन फॉर युनिटी’ (एकता दौड) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांचेसह अधिकारी, कर्मचारी, प्रतिष्ठीत नागरिक व व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला.
देशभरात दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांच्या जयंती दिनी राष्ट्रीय एकता आणि अखंडतेच्या संदेशाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने “रन फॉर युनिटी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आज शुक्रवारी माहूर येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भारताला एकत्र बांधण्यात सरदार पटेल यांच्या भूमिकेची आठवण करून देणे हा या रन फॉर युनिटी च्या आयोजनाचे उद्दिष्ट असून देशभरातील लोकांना एकत्र आणणे, तरुणांना देशाप्रती देशभक्ती आणि सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी प्रेरित करणे,सरदार पटेल यांच्या त्यागाला आणि देशाच्या एकीकरणात केलेल्या कार्याला आदराने उजाळा देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
माहूर येथे आयोजित या कार्यक्रमात धावण्यासोबतच, राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेत सरदार पटेल यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. सकाळी ०७:३० ते ०८:०० वा. दरम्यान सह्याद्री टी पॉइंट येथून सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती निमित्त रन फॉर युनिटी चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे,सपोनि शरद घोडके, पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव, पोलीस अंमलदार जाधव, राऊत, कोरडे, मुहूरले,ककावडे, सोनसळे, खंदाडे, महिला अंमलदार शिल्पा राठोड, शिवानंदा जाधव,सोनू भुरके, सारिका राठोड, मनीषा चव्हाण, नीलम राठोड यंनी सहभाग घेतला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या प्रमुख व्यक्तींनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले आहे, ज्यामुळे या कार्यक्रमाचे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित होते.
 
	    	 
                                




















 
                