सांगली – जिल्ह्यातील कडेगांव ठिकाणी लाईक फिटनेस तर्फे नगराध्यक्ष श्री या पश्चिम महाराष्ट्र स्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . स्पर्धेचा विजेता कोल्हापूरचा अजिंक्य रेडेकर तर उपविजेता सोलापूरचा पंचाक्षरी लोणार ठरला .लोणार सोलापुरातील इलिजियम क्लबचा खेळाडू आहे.
सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर , रत्नागिरी या जिल्ह्यातील 103 स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला . सोलापूरचा युनूस शेख ने 70 की गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला . युनूस शेख हा मॅकझिमम जिमचा खेळाडू आहे.
या यशाबद्दल सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन अध्यक्ष संतोष भाऊ पवार व सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी अभिनंदन केले.



























