तभा फ्लॅश न्यूज/बदनापूर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय, बदनापूरच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे धोपटेश्वर मोसंबीतील फळगळ या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी महाविद्यालयातील वनस्पती रोगशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. एस. व्ही. पवार यांनी मोसंबी पिकातील रोग व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करून एकात्मिक रोग व्यवस्थापनावर भर दिला. तसेच फळबाग तज्ञ डॉ. श्रुती वानखेडे यांनी मोसंबी पिकाचे लागवड व्यवस्थापन व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमामध्ये उपस्थित शेतकर्यांसोबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले, यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध समस्या महाविद्यालयातील तज्ञांच्या समोर मांडल्या व महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापक बी. व्ही. पाटील, डॉ. पी. ए. पगार, डॉ. एन. डी. देशमुख, डॉ. ए. एल. सुरडकर यांनी त्या समस्यावर समाधानकारक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डी. के. पाटील, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, कृषी महाविद्यालय, बदनापूर यांनी शेतकर्यांना एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याचा आग्रह केला.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी कृषी कन्या कु. मुक्ता पिठारे, कु. प्रियंका तळपे, कु. सुजाता पांढरे, कु. अर्चना जाधव, कु. अर्चना वाघमारे, कु. अनुराधा जाधव, कु. साक्षी कोल्हे, कु. स्मिता खिल्लारे, कु. मयुरी जाधव, कु. सलोनी, कु. प्रियंका आदी विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी धोपटेश्वरचे सरपंच प्रतिनिधी श्री. ताराचंद फुलमाळी, उपसरपंच नंदकिशोर दाभाडे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.