अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाकडून पवित्र कार्य घडत असून, न्यासाच्या परिसरात अंत्यत नीटनेटकेपणा, शिस्तबद्धता, सुंदरता असल्याचे मनोगत श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजेभोसले यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत छत्रपती सौ दमयंतीराजे उदयनराजे भोसले (सातारा) यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, अनिल बिराजदार, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.



















