तभा फ्लॅश न्यूज/भोकरदन : बहुचर्चित लोकमान्य सार्वजनिक वाचनालयाच्या स्वयंघोषित पदाधिकाऱ्याला सहधर्मादाय कोर्टाने रद्दबातल ठरविले आहे. शहरासह तालुक्यामध्ये लोकमान्य सार्वजनिक वाचनालय हे लोक चळवळीचे केंद्र बनले आहे. संस्थेचा विकास वेगाने झाल्याने संस्था हडपण्यासाठी मतलबी लोकांनी प्रयत्न सुरू केले होते.
खोटी कागदपत्रे दाखल करून सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडून मान्यता मिळवली होती. सदस्य मान्यतेचे स्यु मोटो प्रकरण सह धर्मादाय कोर्ट संभाजीनगरकडे गेले होते. जून २०२२ मध्ये कोर्टाने सदस्य मान्यता फेटाळली होती. या विरोधात स्वयंघोषित सदस्य हायकोर्टात गेला होता. मृत्यू पावलेल्या अर्जदाराला नोटीस दिली असा तांत्रिक मुद्दा माडला होता. प्रकरण पुन्हा नव्याने चालवावे व इच्छुकांना सहभागी करून घ्यावे असा आदेश दिला होता.
वाचनालयाच्या वतीने संस्थापक सचिव यांनी नंदकिशोर देशमुख याला हायकोर्टाने गुन्हेगार ठरवले असून संस्थेच्या घटनेप्रमाणे गुन्हेगार व्यक्ती सदस्य राहू शकत नसल्याचे म्हणणे मांडले होते. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून सह धर्मादाय न्यायाधिश पावसकर यांच्या कोर्टाने सदस्य रद्द ठरवले आहे. स्वयंघोषित नंदु-चंदुच्या आगावुपणाचा फटका नविन घेण्यात आलेल्या विजय धोंगडे यांना बसला असुन हायकोर्टात जाऊनही दिलासा मिळालेला नाही. या निकालाने ” भगवान के दरबार में देर है अंधेर नहीं ” हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.