सोलापूर : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमानाने शालेय 14 वर्षाखालील मुलींच्या गटात हॉकी स्पर्धेमध्ये सहस्त्रार्जुन प्रशालेच्या खेळाडूने तृतीय क्रमांकाचे विजेतेपद पटकवले. तृतीय सामना नारायणगाव पुणे ग्रामीण स्कूल बरोबर झाला. निरधारित वेळेत सामना हा बरोबरीत सुटला पेनल्टी स्ट्रोक वर सहस्राजून प्रशालेने चार दोन ने विजय संपादन केले.
संपूर्ण स्पर्धेमध्ये कल्याणी नागनसुरे याचा खेळ उत्कृष्ट झाला. विजयी संघात कर्णधार शेषाद्री मोघे, कल्याणी नागणसूरे, सुकन्या माने, गोलकीपर श्रेया हौजी, वर्षाराणी गोरकल, श्रावणी घदुरे, सोम्या स्वामी, साक्षी स्वामी, प्रणाली पोपल ,तनुजा हक्के, पूर्वा हक्के, संस्कृती माकणे, , ईश्वरी खताळ, रचना हंडे, समृद्धी राठोड.
या खेळाडूंचा सहभाग होता. शारीरिक शिक्षक संचालक डॉ. उज्वल मलजी, राजेश वरगंटी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले
संस्थेचे अध्यक्ष संजीवसा बिद्री, शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री. राजुसा भुमकर, संस्थेचे सचिव श्री. जयकुमारसा कोल्हापुरे, शैक्षणिक संस्थेचे सचिव गजानन गोयल, प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा माने , इंग्लिश मीडियम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी बिराजदार. इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सविता हातवळणे यांनी विजयी संघाचे कौतुक केले.
























