अकलूज – सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि. शंकरनगर-अकलूज व विविध संस्थांचे वतीने कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षि कै. शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील यांच्या ४७ व्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये बुधवार 11 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी ७.०० ते ८.०० वा सहकार महर्षिच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक समाधीस्थळ, शिवरत्न बंगला ते सहकार महर्षि कारखाना मुख्य कार्यालय पर्यंत काढणेत येणार आहे. तद्नंतर मुख्य कार्यालयाचे समोरील संस्थापक सहकार महर्षि काकासाहेब यांचे पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करण्यात येऊन सहकार महर्षिच्या जिवनावर शालेय मुलामुलींची भाषणे संपन्न होणार आहेत.
तसेच सदर दिवशी रात्री ८.०० ते १०.०० या वेळेत ह.भ.प.श्री. अंकुश महाराज रणखांबे, रा. गिरवी यांचे सुश्राव्य श्रीहरी किर्तनाचे आयोजन श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज यांचे वतीने करण्यात आले असून याचा लाभ पंचक्रोशितील भाविकांनी असे आवाहन श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने केले आहे.

















