सांगोला – श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती सांगोला शहरातील खडतरे गल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच सांगोला नगरपरिषद मध्ये संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष आनंदा माने यांनी केले.
यावेळी नगरसेवक माऊली तेली, अरुण पाटील, राजेश खडतरे, दिपक खडतरे, प्रविण खडतरे, सोनू खडतरे, महेश खडतरे, पप्पू खडतरे, शैलेंद्र खडतरे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















