सोलापूर : श्री संत गुरु रोहिदास महाराजांची जयंती सर विश्वेश्वरय्या को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सभागृहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण,पंचशील घेऊन करण्यात आली. याप्रसंगी शाहीर रमेश खाडे यांनी श्री संत रोहिदास महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडून, ऐतिहासिक घटनाक्रम सांगितला.
संस्थेचे सचिव मोहन कांबळे, प्रा. डॉ. सुहास उघडे यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी संस्थेचे खजिनदार अभिमन्यू कसबे, किसन कांबळे, क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.




















