सांगोला – विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेज येथील इ.११ वी शास्त्र शाखेची विद्यार्थिनी साक्षी संतोष केदार हिने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने जन.अरुण कुमार वैद्य स्टेडियम, पुणे येथे घेण्यात आलेल्या विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी प्रवेश मिळविला.
या यशस्वी खेळाडूचा संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते व संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक काकसो नरुटे व क्रीडा शिक्षक यांचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
या यशस्वी खेळाडूला क्रीडा शिक्षक प्रा.सचिन चव्हाण, सुनील भोरे, प्रा.डी.के.पाटील, नरेंद्र होनराव, सुभाष निंबाळकर, प्रा.संतोष लवटे यांचे मार्गदर्शन मिळाले. यशस्वी खेळाडूचे संस्था उपाध्यक्ष ॲड.विजयसिंह चव्हाण, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके, प्राचार्य अमोल गायकवाड, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



















