माढा : माढा तालुक्यातील ७ जिल्हा परिषद – व १४ पंचायत समिती गणासाठी ७११ अर्जाची विक्री झाली असून बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी २११ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन दिवसात जिल्हा परिषदेच्या ७ व पंचायत समितीच्या १४ जागेसाठी एकूण २४६ अर्ज दाखल झाले आहेत.
ज्या उमेदवाराला एबी फॉर्म मिळाले त्यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच मानेगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले दादासाहेब साठे व सुहास पाटील जामगावकर यांच्या एबी फॉर्म देण्यासाठी नाट्यमय घडामोडी घडवून फॉर्म भरण्याच्या अंतिम क्षणी सुहास पाटील जामगावकर यांना एबी फॉर्म देण्यात आला.
गट निहाय उमेदवार संख्या
भोसरे – १८
मानेगाव -१५
उपळाई (बु)-०८
कुर्डू -०७
टेंभूर्णी-०७
बेंबळे-११
मोडनिंब- ०८
गण निहाय उमेदवार संख्या –
रोपळे (क)-०७
भोसरे-१६
मानेगाव-१२
दारफळ-०८
उपळाई (बु)-०८
भुताष्टे-१८
कुर्डू-१५
अकोले (खु)-१०
रांझणी-१७
टेंभुर्णी-१४
पिंपळनेर-१९
बेंबळे-१०
लऊळ-०७
मोडनिंब-०६


























