सोलापूर : यश सिध्दी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र यांच्यातर्फे दादर येथील चैत्यभूमी येथे 69 महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य महार रेजिमेंटच्या राज्यभरातून आलेल्या माजी सैनिका समवेत ही मानवंदना देऊन पुष्पचक्र वाहण्यात आले. यावेळी सल्लागार सुभेदार वसंत मस्के, राज्याध्यक्ष प्रदीप गायकवाड, राज्यउपाध्यक्ष शिवपुत्र घटकांबळे, राज्यकोषाध्यक्ष श्यामराव भोसले, राज्यसचिव कैलाश खिलारे , राज्य विधी सल्लागार ॲड. राजेंद्र खोब्रागडे, पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष वानखेडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष पोपट आल्हाट, अजित न्यायनिर्गुणे , महेंद्र गवई , मंगेश चौरे, रेवणसिद्ध सोनकांबळे, किरण जगताप आणि बहुसंख्य माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, वीरमाता उपस्थित होते.





















