नांदेड / हदगाव – शहरातील पंचशील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान दिवंगत भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त संस्थेचे सचिव सुनील हरिहरराव सोनूले यांनी प्रतिमा पुजन करुन अभिवादन केले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बंड्रेवार,जेष्ठ शिक्षक दिगंबर ताडेवाड,परीक्षा विभाग सहाय्यक सुनील सूर्यवंशी,ग्रंथपाल सतीश प्यादेकर,प्रयोगशाळा सहाय्यक वैभव टाले, प्रमोद जाधव,परमेश्वर वाकोडे,शोभाबाई सुर्यवंशी,ममताबाई,पुजा जंगवाड सह आदि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा हुलकाने यांनी केले.
 
	    	 
                                




















 
                