सोलापूर : संविधान संविधान बचाव समिती सोलापूर आयोजित 26 नोव्हेंबर रोजीच्या महामोर्चात समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूर सक्रिय सहभागी होणार असल्याची माहिती समता सैनिक दलाचे जेष्ठ सल्लागार अण्णासाहेब भालशंकर यांनी समता सैनिक दलाच्या सभेत दिली.
सोलापूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर संपन्न झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाच्या जीओसी सुमित्रा केरू जाधव या होत्या.या सभेत समता सैनिक दलाचे सैनिक पांढऱ्या शुभ्र गणवेशांमध्ये उपस्थित राहणार असल्याचे जिओसी सुमित्रा जाधव म्हणाल्या. या सभेला संविधान बचाव समिती महामोर्चाचे निमंत्रक ज्येष्ठ कामगार नेते अशोक जानराव, यशवंत फडतरे आदींनी संबोधित केले.
यावेळी दलाचे महासचिव अनिल जागझाप,मुकुंद चंदनशिवे, महामोर्चाचे निमंत्रक राजा सोनकांबळे,सिद्धार्थ जाधव, फारुक शेख, वास्तुविशारद राजरत्न फडतरे, विठ्ठल थोरे, सुचित्रा थोरे, रणदिवे ,अरुण गायकवाड, सुनीता गायकवाड, कुमार चंनोपागोलो, विनोद जाधव, प्रीपोवेल जाधव, कुणाल जानराव, माजी स्थायी सभापती मधुकर आठवले, भारतीय बौद्ध महासभेचे दीपक आठवले, भीमशक्ती संघटनेचे राजा रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते. या सभेचे प्रास्ताविक महासचिव अनिल जगझाप यांनी केले तर विनोद जाधव यांनी आभार मानले.



















