श्रीपूर – श्रीपूर ता . माळशिरस येथिल समिर बबनराव वजाळे यांची राष्ट्रवादी कॉग्रेंस (अजित पवार ) पक्षाच्या जिल्हा स्टचिटणीस पदाबरोबर मुंबई प्रतिनिधी या पदाची उतिरिक्त जबाबदारी दिली आहे .
या बरोबरच बोरगांव ता . माळशिरस येथिल उदयसिंह माने – देशमुख यांची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली .
राण्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉग्रेंस पक्षचे अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्रीअजितदादा पवार , प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे व सोलापूर जिल्हा अध्यक्ष यांच्या आदेशाने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत .
सद्य स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी चालु झाली असून सोलापूर जिल्ह्यतील राष्ट्रवारीचे कॉग्रेसचे (अ . प ) बडे नेते पक्ष सोडून गेले आहेत . त्या पार्श्वभूमीवर पक्षाने सोलापूर जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केलेले दिसून येते कारण जिल्ह्या साठी जब्मो कार्यकारणी व पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या गेल्या आहेत .
यात समिर वजाळे यांना जिल्हा सरचिटणीसा बरोबर मुंबई प्रतिनिधी निवडले गेले आहे . कारण वजाळे यांना मंत्रालयतील कामाची माहिती असल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना मंत्रालयात कोणतीही अडचण येवू नये कामे मार्गी लागावीत हा उद्देश आहे .
या बरोबरच बोरगांव येथिल उदयसिंह माने – देशमुख हे पूर्वी राष्ट्रवादी ( श . प .) पक्षाचे काम करीत होते . लोकसंग्रह व ग्रामीण भागातील त्यांच्या कार्याची दखल घेत थेट त्यांना वरिष्ठ उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे .
निवडी नंतर समिर वजाळे व उदयसिंह माने – देशामुख यांनी पक्ष श्रेष्ठींनी जी जबाबदारी सोपवली आहे ती आम्ही प्रामाणिक पणे पार पाडून राष्ट्रवादी कॉग्रेस (अ .प . ) पक्षाची ताकद वाढविणे तसेच पक्षाची भूमिका प्रत्येक नागरिकां पर्यंत पोहोचवण्याची पराकाष्ठा करू असे सांगितले .
दोघांच्या निवडीचे श्रीपूर , बोरगाव परिसातून स्वागत होत आहे .


















