सोलापूर – ग्रामीण हद्दीतील पंढरपूर तालुक्यातील सराईत वाळु तस्कर सुरज शिंदे यास MPDA कायदयान्वये येरवाडा कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.
सुरज शिंदे यांचे विरूध्द अवैधरित्या वाळू उपसा करणे, वाळु चोरी करणे, चोरलेली वाळुची वाहतुक करून ती विक्री करीता पाठवणे व इतर, स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापुर्वी त्यास अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक यांनी हद्दपार केले होते. तरी देखील सुरज शिंदे याने पुन्हा पुन्हा गुन्हेगारी कारवाई करुन सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत व भिती निर्माण होती. कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधीत झाली होती.
पोलीस निरीक्षक, टि.वाय. मुजावर ने. पंढरपुर तालुका पोलीस ठाणे यांनी त्यास ताब्यात घेवून येरवडा कारागृह, पुणे येथे स्थानबध्द केले. वाळुतस्करी करणारे व शरिराविषक व मालाविषयक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे तसेच अवैधदारू विक्री करणाऱ्या इसमांचे गुन्हेगारी अभिलेख तयार करण्यात आले आहे. त्यांच्यावर अशाच स्वरूपाची प्रभावी कारवाई यापुढे देखील करण्यात येईल.
सदरची कार्यवाही अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शना खाली प्रशांत डगळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजय जगताप, ने. स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक, टि. वाय. मुजावर, सपोनि रेळेकर, पोसई भोसले, वडणे, सपोफौ गयकवाड, पोकों सागर गवळी, ने. पंढरपूर तालुका पोलीस ठाणे, पोहेकॉ अनिस शेख, पोहेकॉ मोहन मनसावाले, ने. स्थानिक गुन्हे शाखा, तसेच जिल्हादंडाधिकारी, कार्यालयाकडील उत्कर्ष देवकुळे, व विलास म्हेत्रे व इतर अधिकारी व अंमलदार यांनी कामकाज केला आहे.






















