सांगोला – सांगोल्यातील साने गुरुजी कथामालेच्या वतीने सांगोला विद्यामंदिर येथे आयोजित गुणवंत शिक्षक सन्मान सोहळा मंगळवेढा येथील कवी इंद्रजीत घुले यांच्याहस्ते संपन्न झाला. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.प्रबुद्धचंद्र झपके तसेच प्रा.नानासाहेब लिगाडे, डॉ.शिवराज भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या प्रतिमेला अभिवादन करून शिवाजी बंडगर यांनी साने गुरूजी यांची खरा तो एकची धर्म या सामुदायिक प्रार्थनेने करण्यात आली.
यावेळी इंद्रजीत घुले, प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, प्रा.नानासाहेब लिगाडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी दलितमित्र साबळे गुरुजी यांना स्व.रामदास भोसले जीवन गौरव पुरस्कार, विजयकुमार इंगवले (जि.प.प्रा.केंद्रशाळा, सोनंद), वैशाली गुजरे (जि.प. प्रा.केंद्रशाळा, शिरभावी), धनंजय डोंगरे (मुख्याध्यापक, जवाहर विद्यालय, घेरडी) आणि शुभांगी कवठेकर (उत्कर्ष प्राथमिक विद्यालय, सांगोला) यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच कथामालेचे सदस्य अरविंद डोंबे यांनी अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त काळा मळा (राजेवाडी) जि.प शाळेला ७५ हजार रुपये देणगी दिल्याबद्दल व सावित्रा कस्तुरे यांची प्राथमिक शिक्षक पतसंस्था चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल तसेच प्रा.राजेंद्र ठोंबरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कथामालेचे अध्यक्ष भीमाशंकर पैलवान यांनी केले. आभार बापू भंडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कथामालेचे सचिव सुनिल लिगाडे, सदस्य नारायण विसापुरे, बाळासाहेब वाघमारे, सोमनाथ सपाटे, नीलकंठ लिंगे यांनी सहकार्य केले.
























