सांगोला – जिल्हाधिकारी सोलापूर यांचे आदेश अन्वये सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक- २०२५ कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि.१० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत नगराध्यक्ष पदासाठी ३१ नामनिर्देशन व सदस्य पदासाठी ३३९ नामनिर्देशन प्राप्त झाले होते. त्यापैकी दि.१८ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन छाननीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी २० उमेदवारांचे नामनिर्देशन व सदस्य पदासाठी २३२ उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरविण्यात आले आहेत.
नामनिर्देशन वैध ठरलेले उमेदवार आपला स्वतःचा नामनिर्देशनपत्र आज शुक्रवार दि.२१ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सांगोला तहसील कार्यालय येथे उपस्थित राहून मागे घेऊ शकतात अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सैपन नदाफ यांनी दिली.
तसेच जागा क्र.१ अ व ११ अ यासाठी जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे अपील झालेले असल्याने यामधील उमेदवार दि.२५ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेऊ शकतात अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी दिली.


















