सांगोला – मंगळवार दि.६ जानेवारी रोजी सांगोला नगरपरिषदेच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे पत्रकार दिनानिमित्त नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.
यावेळी बोलताना आनंदा माने यांनी पत्रकार बांधवांना शुभेच्छा देत त्यांची प्रमुख मागणी असलेल्या प्रलंबित पत्रकार भवनाच्या मागणीबाबत लवकरच सकारात्मक कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार हमीद इनामदार, रवी कांबळे, मनोज उकळे, शशिकांत कोळी, दिपक ऐवळे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नगरसेवक, पत्रकार बांधव, नगरपरिषदचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
















