टेंभुर्णी – संजयमामा शिंदे विकास सेवा सहकारी सोसायटी यांनी दिवाळीच्या निमित्ताने सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर केला असून त्याचे प्रतिनिधिक वाटप माढा तालुक्याचे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे यांचे हस्ते टेंभुर्णी येथील भवानी मंदिर या ठिकाणी समारंभ पूर्वक करण्यात आले यावेळी संस्थेचे चेअरमन अनंतराव कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
2003 साली स्थापन झालेल्या या संस्थेने यावर्षी प्रथमच लाभांश वितरण केला आहे सदरच्या कार्यक्रमाला विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक रमेश येवले पाटील माजी सरपंच दत्तात्रय देवकर ,माजी सरपंच परमेश्वर खरात ,ज्येष्ठ नेते डी. के देशमुख सर ,मस्तुत सर मार्केट कमिटी संचालक रामभाऊ वाघमारे ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ थोरात, सचिन होदाडे, तुकाराम डोके ज्येष्ठ नेते रामभाऊ शिंदे व सोसायटीचे संचालक मंडळ नंदकुमार राऊत, भारत थोरात, संजय लोंढे, गजेंद्र कुटे, रामचंद्र ढगे, संतोष डोके, जगन्नाथ मडके ,नंदकुमार कथले ,साधू मदने ,पोपट कुटे सोनवणे दादा व बहुतांश सभासद उपस्थित होते.
यावेळी बोलताना विक्रमसिंह दादा शिंदे यांनी संस्थेचे कौतुक केले तसेच आगामी काळात सर्वांनी आर्थिक शिस्त पाळावी तसेच सोसायटीच्या कर्जाची वेळेवर परतफेड करावी तसेच काही अडचण असल्यास विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना कायम संस्थेच्या हिताच्या दृष्टीने सहकार्य करेल असे सांगितले.
यावेळी नूतन सोसायटी सचिव म्हणून निवड झालेले सिद्धेश्वर महाडिक पोटरे, पवार यांचाही सन्मान विक्रमसिंह शिंदे यांचे हस्ते करण्यात आला यावेळी डीसीसी बँकेचे अधिकारी अतुल धुमाळ ,मोहन ननवरे सचिव घाडगे भाऊसाहेब बागवाले भाऊसाहेब ,चौधरी भाऊसाहेब आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारवे गुरुजी यांनी केले