अक्कलकोट – तालुक्यातील कल्लप्पावाडी येथे जागृत संजीवनी समाधी श्री सदगुरू मंगलदास महाराज यात्रा यंदाही बुधवार २२ रोजी दीपावली पाडवा पासून सुरवात होऊन शनिवार २५ पर्यंत विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती माजी सभापती तथा पंच कमिटी अध्यक्ष महेश जानकर यांनी दिली आहे.
या यात्रा निमित्ताने महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यांतील साधुसंत शेकडोंच्या संख्येने उपस्थित असतात यामुळे या यात्रेस मोठ्या संख्येने गर्दी असते. २२ रोजी रात्री १० वाजता अग्नी प्रज्वलन होणार आहे. २३ रोजी पहाटे श्री सदगुरू मंगलदास महाराज मंदिरात महापुजा श्री मंगलदास महाराज श्री बिरलिंगेश्वर महाराज पालखी गंगास्नान करुन दुपारी १२ वाजता अग्नी प्रवेश होईल. मंगलनगर मित्र परिवार कडून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. श्री मंगलदास महाराज नवतरुण नाट्य संघ कल्लप्पावाडी यांच्या कडून धर्मद नुडी, बेंकीय किडी अर्थात अनाथ कट्टीद अरषिणद ताळी या कन्नड नाटकांचे प्रथम प्रयोग होणार आहे. २४ रोजी सकाळी ९ पासुन संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सौ.अवम्मा पुजारी बेल्याळ ता.निडगुंदी जि विजयपुर व मौला मकानदार मशीबनाळ.ता बसवनबागेवाडी जि विजयपुर.याचे धार्मिक व सामाजिक आध्यात्मिक विषयावर कलगीतुरा चे कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी ४ वाजता भव्य जंगी पैलवानाचे कुस्ती स्पर्धा होईल. रात्री ९ वाजता कन्नड नाटकांचे व्दितीय प्रयोग होणार आहे.२५ रोजी श्री मंगलदास महाराज पालखी व श्री बिरलिंगेश्वर महाराज पालखी गावातील प्रमुख मार्गानें मिरवणूक होणार असून मंदिरात आल्यानंतर दोन्ही पालखीचे भेटी होतात. यात्राच्या काळात दिवसभर महाप्रसाद वाटप राहील.