सांगोला – येथील सांगोला महाविद्यालयात संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त सोमवार दि.८ डिसेंबर रोजी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ.टी.आर.माने यांचेहस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
संत जगनाडे महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या गाथेचं पुनर्लेखन केलं व आपल्या अभंगांमधून समता, भक्ती, नीतिमूल्ये व मानवता यांचा प्रसार केला.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा व विचारांचा आदर्श घ्यावा असे मत इतिहास विभागातील डॉ. सदाशिव देवकर यांनी यावेळी व्यक्त केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबासो इंगोले यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

























