Monday, February 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

धुंडामहाराज देगलूरकर मठात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजन

तरुण भारतbyतरुण भारत
November 4, 2025
in solapur
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर – कार्तिक एकादशीच्या पवित्र महापर्वानिमित्त येथील विठ्ठल मंदिरात श्रीपांडुरंग-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर राज्यातील तसेच श्रीक्षेत्र पंढरपूर क्षेत्रातील सकल ज्येष्ठ कीर्तनकार, संत साहित्य अभ्यासक आणि संतवंशज यांचा संतपूजन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रद्धापूर्वक पार पडला.

अनेक वर्षे देवाची पूजा केल्यानंतर संतांच्या पूजेचा मानस उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मनी होता. या भावनिक संकल्पनेतून “वारकरी हाच आमचा व्हीआयपी आहे” हा संदेश देत त्यांनी संत परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प. पू. श्रीगुरु श्री चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी उपस्थित सर्वांच्या वतीने मनोगत व्यक्त करत आशीर्वाद दिले.

या भव्य सोहळ्याचे संयोजन शिवसेना धर्मवीर  आध्यात्मिक सेना तर्फे करण्यात आले. उमेश  महाराज बागडे यांनी वारकरी संप्रदायाची भूमिका व संप्रदायाचे एकनाथ शिंदें  वरील प्रेम याबद्दल मनोगत व्यक्त केले. यावेळी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक पू. श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर, श्री  चंद्रशेखर महाराज देगलूरकर, श्रीगुरुराजमहाराज देगलूरकर, श्रीगुरु श्री प्रमोदमहाराज जगताप यांच्यासह अनेक संतपरिवारातील मान्यवरांशी एकनाथ शिंदे यांनी आत्मीय संवाद साधला. शेकडो वर्षांची संत परंपरा जपणाऱ्या या संतमंडळींशी पारिवारिक वातावरणात हितगुज साधण्यात आले.

संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत गंगूकाका शिरवळकर यांचे वंशज, संत निवृत्तीनाथ संस्थान व संत मुक्ताई संस्थान विश्वस्त, बडवे उत्पात परिवार, वारकरी फडकरी संघटना, वारकरी पाईक संघ, वारकरी संप्रदाय युवा मंच, अखिल वारकरी गुरुकुल संघ, सद्गुरू सेवा समिती आणि संत सेवा संघ यांचे प्रतिनिधी या सोहळ्याला उपस्थित होते

यावेळी मंत्री भरत गोगावले, आमदार समाधान आवताडे  तसेच शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे सचिव श्रीराम महाराज माळी आदींसह पदाधिकारी व संतप्रेमी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————–

पूरग्रस्त भागातील गावांना भजन साहित्य भेट –
या प्रसंगी पूरग्रस्त भागातील शंभर गावांना भजन साहित्य पखवाज, टाळ, वीणा व ग्रंथसंपदा भेट स्वरूपात देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

Post Views: 13
Previous Post

नामसंकीर्तन सभागृहासाठी २० कोटी निधीची मागणी, माजी आमदार प्रशांत परिचारक

Next Post

शरद पवारांचे राष्ट्रवादी कार्यालय निघाले विक्रीला ! राजकीय वर्तुळात आले चर्चेला उधाण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शरद पवारांचे राष्ट्रवादी कार्यालय निघाले विक्रीला ! राजकीय वर्तुळात आले चर्चेला उधाण

ताज्या बातम्या

तीन हजार शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार.#school #teacher #viral #public

February 16, 2026

25 हजार लेझीम पथकाच्या गजरात शिवजयंती मिरवणूक.#public #marathinews #shivajimaharajjayanti

February 16, 2026

पाण्याच्या विषयावर महापौर घेतील का बैठक? #viral #marathinews #solapurnews

February 16, 2026

सख्ख्या भावाने केला मोठ्या भावाचा खून.#murdernews #ब्रेकिंगन्यूज़ #viral #news #टेंभुर्णी

February 16, 2026

ग्रंथालय कर्मचारी यांचे प्रलंबित मागण्यां बाबत निर्णय घेण्यात यावा – सदाशिव बेडगे

February 16, 2026

लव जिहादच्या विरोधात महिलांनी एकत्रित येत दिली शासन निर्णयाची फोटो फ्रेम

February 16, 2026

युवक मंडळ यांच्यावतीने कक्कय्या जयंती साजरी

February 16, 2026

भैरूरतन दमाणी अंधशाळेकडून कु. गंगा कदम हिचा गौरव

February 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0682895

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697