.
टेंभुर्णी – संत रोहिदास महाराज (रविदास) हे भक्ती चळवळीतील महान संत-कवी होते.त्यांचा जन्म साधारण १५व्या शतकात काशी (वाराणसी) येथे झाला .ते चर्मकार (चांभार) समाजातून होते. त्यांनी आपल्या आयुष्यातून समता, मानवता आणि भक्ती यांचा संदेश दिला.त्यांनी सांगितलं की देवभक्तीसाठी जात-पात, उच्च-नीच काहीच महत्त्वाचं नाही .मन शुद्ध आणि प्रेम भाव असणं महत्त्वाचं. संत रोहिदास महाराज हे समतेचे, भक्तीचे आणि समाजसुधारणेचे प्रभावी संत होते असे प्रतिपादन हभप विकास महाराज गोसावी यांनी केले आहे.
कन्हेरगांव तालुका माढा येथे श्री संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हभप विकास महाराज गोसावी बोलत होते.
हाचि नेम आतां न फिरें माघारी
बैसलें शेजारीं गोविंदाचे
घररिघी झालें पट्टराणी बळें
वरीलें सांवळें परब्रह्म
बळियाचा अंगसंग झाला आतां
नाहीं भय चिंता तुका म्हणे
या अभंगाचे विवेचन करताना महाराजांनी सांगितले की ,देवाशी नातं जडलं की भक्त मागे फिरत नाही; भक्तीमुळे कृष्णाचा सहवास मिळतो आणि मग भीती-चिंता संपते.म्हणजे भक्तीचा निर्णय पक्का झाला आहे; संसाराकडे परत वळायचं नाही. अंतःकरणात भक्तीची ताकद आली आणि देवाशी नातं जडलं जाते,आता त्या बलवान देवाचा मला सहवास मिळाला आहे; म्हणून मला भीती, चिंता काहीच उरलेली नाही,” देवाजवळ गेल्यावर मन निश्चिंत होतं असे मत हभप विकास महाराज गोसावी यांनी केले आहे.
यावेळी उपसरपंच लिंबाजी मोरे ,सरपंच श्रीकांत बनसोडे, कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे ,ज्योतीराम कांबळे , हभप नामदेव महाराज शिंदे, अमोल मोरे, मृदुंगाचार्य हनुमंत केंगार ,सदस्य गणेश माने , विष्णू मोरे, जयराम डोके, गणेश शिंदे, श्रीमंत पाटील, केशव डोके, शिवदास पाटील, जालिंदर डोके, नागनाथ भगत , नागनाथ डोके, बळीराम शिंदे, विकी मोरे , तुकाराम केदार, राजेंद्र डोके ,दत्तात्रय पाटील, महादेव पाटील, भारत डोके, दत्तात्रय सुतार, सुभाष गायकवाड, वामन लोंढे, हनुमंत भाग्यवंत , यल्लाप्पा सोनवणे , तुकाराम शिंदे, राजेंद्र शिंदे, रवींद्र शिंदे, मारुती मोकाशी , देविदास जाधव, नवनाथ सोनवणे, संजय सुतार ,आबा धुमाळ यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
,


























