Maharashtra, 11 जुलै (हिं.स.)
वारकरी संप्रदायाचा वार
अहमदनगर, 11 जुलै (हिं.स.):- महाराष्ट्र ही संतांची पावनभूमी आहे.वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आपल्याला मिळाला असून आजच्या युवा पिढीने पुढे घेऊन जाण्याचे काम करावे.गवांदे क्लासेसच्या माध्यमातून चांगले विद्या र्थी घडविण्याचे काम केले जात असून शैक्षणिक धार्मिक आणि सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन हभप राऊत महाराज कदम यांनी केले.
आषाढी एकादशीनिमित्त श्री संत शिरोमणी जनार्दन स्वामी यांच्या आशीर्वादाने भायगांव तालुका वैजापूर ते श्री श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत गवांदे क्लासेसच्या वतीने करण्यात आले.यावेळी हभप राऊस महाराज कदम,प्रा. प्रभाकर गवांदे आदींसह भावीक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हभप राऊत महाराज म्हणाले की,शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना अध्यात्मिकतेचे धडे द्यावे त्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी निर्माण होईल.प्रा. प्रभाकर गवांदे हे खऱ्या अर्थाने गरजू विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहेत.विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात पंढरपूर मध्ये दाखल होत असतात.ऊन,वारा,पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता सर्व जाती धर्माचे लोक विठुरायाच्या दर्शनाने मंत्र मुग्ध होत असतात,असे प्रतिपादन हभप राऊस महाराज कदम यांनी केले.