मुदखेड / नांदेड – मुदखेड येथील तहसील कार्यालयात तेली समाज बांधव, महसूल प्रशासन आणि पत्रकारांच्या उपस्थितीत संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
तहसील कार्यालयात दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता नायब तहसीलदार संतोष कामठेकर यांच्या शुभहस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले.
नायब तहसीलदार पाठे यांनी जगनाडे महाराजांच्या कार्याची माहिती सांगून त्यांच्या विचारांवर आधारित आचरण करण्याचे आवाहन केले.
यावेळी नायब तहसीलदार संतोष कामटेकर,नायब तहसीलदार पाटे, नायब तहसीलदार समीर पोवणे, शाम चौधरी, गोविंद पानसरे,विनायकराव वच्छेवार, ईश्वर पिन्नलवार, राम कूलूपवार, चंद्रकांत पिन्नलवार,गंगाधर पंगिरवार, शंकरराव पंगीरवार, शिवाजी पिनलवार,बालाजी आजगुळकर,शैलेश पंगिरवार, महेश पिनलवार, पत्रकार रूकमाजी शिंदे, प्रल्हाद मस्के,धम्मदाता कांबळे, अब्दुल रजाक यांच्या सह महीला कर्मचारी व तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























