सोलापूर – विजापूर नाका परिसरातील समर्थ ज्वेलर्सवर दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. सराफाच्या प्रसंगावधानाने त्यांचा प्रयत्न फसला परंतु चोरांनी विविध युक्त्या वापरून स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला, परंतु गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा उघडकीस आणून सराईत गुन्हेगारांना वेळीच जेरबंद केल्याने सराफ सुवर्णकार व्यापारी असोसिएशनच्यावतीने सराफ कट्टा येथे सोलापूर क्राईम ब्रांच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, एपीआय शंकर धायगुडे, निलेश सोनवणे, पीएसआय मुकेश गायकवाड, पोलीस महासंचालक प्रमाणपत्र धारक दादासाहेब सरवदे यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमणी यांनी असे कर्तबगार अधिकारी पोलीस दलाची शान असल्याचे सांगितले तर पोलीस दलाच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी आभार मानून व्यापाऱ्यांना काळजी घेण्याचे सूचना केल्या. महेश धाराशिवकर यांनी आभार मानले.
याप्रसंगी पूर्वी विभाग अध्यक्ष व्यंकटेश बिटला, प्रकाश चडचणकर, अमित काबणे, प्रदीप भोळा, सोमशंकर कंठीमठ, नागेंद्र रायकर, अनिल बिराजदार, दिगंबर पालनकर, अनिल रेवणकर, सुधाकर शहाणे, भाईकट्टी सराफ, कपिल वेर्णेकर, अनुप रायकर, अभिषेक रामपुरे आदी सराफ व्यापारी उपस्थित होते.























