मेरखेडा येथे अशोक गायके यांचा सेवापुर्ती समारंभ…
तभा वृत्तसेवा
टेंभुर्णी / प्रतिनिधी
जाफराबाद तालुक्यातील
मेरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अशोक गायके यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभात दि .०१ रोजी बोलत असताना शिक्षकी पेशातून मिळणारे समाधान हे सर्वोच्च असल्याचे प्रतिपादन जाफराबाद पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सतिश शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जाधव तर सत्कारमूर्ती अशोक गायके, कासाबाई गायके, शिक्षक संघाचे नेते रिजवान शेख, पतसंस्था फेडरेशनचे संचालक संजय लोखंडे, केंद्रप्रमुख शिवाजी फोलाने, अनंथा जंजाळ, पंकज पाटील शिवशंकर सुरूषे, सरपंच सुखदेव जाधव, उपसरपंच अंकुश जाधव,दिपक जाधव, गणेश खडोळ, दिपक खरात, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालके, जगन वाघ, संतोष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना श्री शिंदे म्हणाले कि श्री गायके यांनी आपल्या सेवेत निष्ठेने आपले कर्तव्य बजावले असून अध्यात्माचा छंद ही त्यांनी जोपासला असल्याचे ते म्हणाले. श्री रिजवान शेख, श्री फोलाने यांची भाषणे झाली.अशोक गायके यांनी आपल्या सेवाकाळातील विविध अनुभव कथन करून सेवाकाळात सर्वांचे सहकार्य लाभल्याचे सांगून समाधान व्यक्त केले.तर गायके यांचा सपत्नीक यथोचित गौरव करण्यात आला. सूत्रसंचलन विश्वास वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक भगवान भालके, नामदेव शेवत्रे, दिपक खंदाडे श्रीमती शुभांगी शिवनीकर यांनी परिश्रम घेतले.