पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव पडळकरवस्ती येथील पडळकर कुटुंबाचे कुलदैवत असलेल्या सतोषा बिरोबा देवाच्या याञेस सातारा जिल्ह्यातील पांगरी येथील सतोषा बिरोबाच्या मंदिरापासून पेटती ज्योत पायी चालत आणून सतोषा बिरोबाच्या याञेस प्रारंभ करण्यात आला.
प्रारंभी सतोषा बिरोबाच्या मंदिरापासून आणलेल्या पेटत्या ज्योतीचे स्वागत बसस्थानकावर नागऱी आघाडीचे अध्यक्ष अरिफखान पठाण, संतोष पडळकर प्रा तुकाराम पडळकर, पेटतीज्योत धारक चि.महिंद्रा पडळकर ,सोपान पडळकर , कल्याणबापू जावळे राजेंद्रसिंग जामदार, उमेश सरवदे दादासाहेब वगरे ,माजी सरपंच अमोल मदने पाटील, तसेच सौरभ पडळकर सतीश पडळकर गौरव पडळकर, संदीप पडळकर, अजिनाथ पडळकर , शुभम पडळकर ,मोहन पडळकर, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .
पडळकर वस्ती येथे सतोषा बिरोबाच्या याञेनिमित्त सुळेवाडी ,इरकरवस्ती, जरगवस्ती झिंजेवस्ती आदी ठिकाणचे गझी ढोल संघ गझीढोलाचा खेळ सादर करतात .
गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर 2025 पासून यात्रेस देवाच्या आरत्या करून गोडव्याचा नैवेद्य दाखवून प्रारंभ करण्यात येतो तर दुसऱ्या दिवशी आजानबळी देऊन उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप केले जाते .
यावेळी पडळकर वस्तीवरचे व पडळकर कुटुंबीयातील तरुण कार्यकर्ते , प्रा तुकाराम पडळकर संतोष पडळकर ,सोपान पडळकर, यांच्या मार्गदर्शनाखाली महिंद्रा पडळकर ,सौरभ पडळकर ,सतीश पडळकर ,गौरव पडळकर संदीप पडळकर, अजिनाथ पडळकर शुभम पडळकर, मोहन पडळकर यांच्यासह तरुण कार्यकर्ते याञा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत .
फोटो
सातारा जिल्ह्यातील पांगरी येथून पायी चालत आणलेल्या पेटत्या ज्योतीचे स्वागत करताना संतोष पडळकर, अरिफखान पठाण, महिंद्रा पडळकर ,सोपान पडळकर, सचिन पडळकर, कल्याणबापू जावळे ,राजेंद्रसिंग जामदार, उमेश सरवदे ,अमोल मदने ,दादा वगरे , कार्यकर्ते व उपस्थित ग्रामस्थ.


















