जालना – महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समाज समिती जिल्हा जालना च्या वतीने शिक्षक पतसंस्थेतून मोठा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शिक्षकांना टीईटी शक्ती निर्णय 15 मार्च 2024 च्या संच मान्यता शासन निर्णय रद्द करणे व इतर विविध प्रलंबित प्रश्नांबाबत पाच मार्च 2025 रोजी राज्यभर शाळा बंद आंदोलन व महामोर्चाबाबत आज रोजी मोर्चा काढण्यात आला.
उत्तमराव वायाळ, दीपक दराडे, संतोष राजगुरू, संजय येळवंते, विजय खडके, भगवान भालके, देवेंद्र बारगजे, मधुकर काकडे, शांतीलाल गोरे, उद्धव पवार, शिवाजी देवडे, लक्ष्मण नेवल, रमेश आंधळे, संजय हेरकर, विनोद अडसूळ, ईश्वर गाडेकर, महादेव वैराळ, अन्सारी नदीम, के डी वाघ, श्रीकांत रुपदे, विनोद कळंबे, संजय बनसोडे, संतोष इंगळे, गणेश फुकट, रमेश बदर, श्रीमती सुचिता वाघमारे, मीनाक्षी पांगारकर, सीमा बदर, संगीता गायकवाड, गबीता सरकटे, नंदा वलकट्टी, यांच्यासह जिल्ह्यातील हजारो शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते.
























