सोलापूर : राज्यातील शाळांमध्ये स्वच्छता, हिरवळ आणि सर्व समावेशक आनंददायक शालेय वातावरण नियमितपणे टिकवून ठेवण्यासाठी शालेय शिक्षणातून वर्णनात्मक परिवर्तन, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन उपक्रम राबविण्याचा सर्व निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये व्यवस्थापनाच्या शाळांनी सहभाग घेण्याचे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले आहेत.
स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन २०२५-२६ हा उपक्रम पूर्वीच्या स्वच्छ विद्यालय पुरस्काराच्या धर्तीवर व्यापक व सार्वत्रिक स्वरूपात सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. शाळांमध्ये स्वच्छता, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरण संरक्षण इत्यादी महत्त्वपूर्ण बाबींची सुलभ कार्यपद्धतीद्वारे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन २०२५-२६ करिता देशातील सर्व शाळांनी सहभागी होणे अनिवार्य असून, यामध्ये शासकीय, खाजगी अनुदानित, खाजगी, निवासी, आदिवासी, अल्पसंख्याक आणि केंद्रामार्फत सुरू असलेल्या (केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांचेद्वारे मान्यताप्राप्त असलेल्या शाळांना सहभागी व्हावयाचे आहे.
स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकनासाठी सहा प्रमुख विषयांवर आधारित ६० प्रश्नांद्वारे स्वयं-मूल्यांकन होईल आणि त्याप्रमाणे सुधारणा करून शाळांचे सक्षमीकरण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शाळेत असलेल्या परसबागेवर आधारित मूल्यांकन आहे. त्यामुळे ‘माझी परसबाग’ या योजनेत सहभागी झालेल्या शाळांना याचा लाभ होणार असल्याचे दिसत आहे.
…
….
शाळांमध्ये स्वच्छता, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरण संरक्षण इत्यादी महत्त्वपूर्ण बाबींची सुलभ कार्यपद्धतीद्वारे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व शाळा सहभागी होणार असल्याने मूल्यांकनासाठी स्पर्धा असणार आहे. त्यामुळे शाळांमध्ये स्वच्छतेची सवय लागण्यास मदत होणार आहे.
बाबुराव कोळी, केंद्रप्रमुख, डोणगाव, उत्तर सोलापूर
…
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व पर्यावरणाविषयी आवड
…
स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन उपक्रम राबविण्यात येणार असल्याने शाळा स्वच्छतेसाठी सरसावणार आहेत. त्यासाठी शाळांमधून विद्यार्थ्यांना स्वच्छता व पर्यावरणाचे धडे दाले जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व पर्यावरणाविषयी आवड निर्माण होण्यास मदत होईल.
अनिल म्हेत्रे, शिक्षक, भंडारकवठे, दक्षिण सोलापूर
























