पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने कर्करोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीराचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून ,फित कापुन पञकार संजय पाटील, अतुल नष्टे, रघुनाथ देवकर, डॉक्टर किरण पोटे,डॉक्टर भिसे,जिल्ह्य समन्वयक इंगोले,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास जाधव व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आहे.यामध्ये 121 जणांची तपासणी करण्यात आली.
सदरच्या कार्यक्रमास जिल्ह्य वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष नवले,जिल्ह्य शल्यचिकित्सक डोईफोडे,डॉक्टर किरण पोटे,स्ञी रोग तज्ञ डाॅकटर भिसे,जिल्ह्य समन्वयक इंगोले ,डाॅकटर विलास जाधव प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारीवर्ग, आशा सेविका यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळेस अत्याधुनिक कर्करोग निदान मोबाईल व्हॅनमधून 121 स्ञी व पुरुषांची तपासणी करण्यात आली.यावेळेस डाॅकटर किरण पोटे व वैद्यकीय अधिकारी डाॅकटर विलास जाधव यांनी उपस्थितांना कर्करोगावरील सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळेस शेख मॅडम यांनी सुञसंचालन व आभार प्रदर्शन केले. फोटो _ पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित कर्करोग निदान शिबीराप्रसंगी डॉक्टर किरण पोटे,डाॅकटर भिसे,इंगोले ,पञकार संजय पाटील, अतुल नष्टे,रघुनाथ देवकर व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास जाधव.






















