Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मंगळवारी नव्हे तर रविवारीच मिरवणूक काढण्यावर शिक्कामोर्तब

तरुण भारतbyतरुण भारत
April 7, 2026
in editor
0
मंगळवारी नव्हे तर रविवारीच मिरवणूक काढण्यावर शिक्कामोर्तब

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2621440;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 41;

0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शहरात विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त मंगळवारी नव्हे तर रविवार दि. 19 एप्रिल 2026 रोजी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनाशी चर्चा झाली. एक बेस, एक टॉप, क्लिअर साऊंड या मिरवणुकीत राहणार आहे. मिरवणूक मार्गावर प्रत्येक चौकात प्रत्येक मंडळांनी केवळ पंधरा मिनिटे थांबविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मंत्री किंवा अधिकाऱ्यांच्या कोणत्याही गाड्यांचा ताफा मिरवणुकीत येणार नाही यावर सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव विश्वस्त समितीचे राजाभाऊ सरवदे आणि राजाभाऊ इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

         भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीने काही दिवसांपूर्वी पारंपारिक रविवारी ऐवजी मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी मिरवणूक करण्याचा निर्णय बैठकीत जाहीर केला होता.  त्यानंतर पारंपारिक पद्धतीने रविवारीच मिरवणूक काढण्यासंदर्भात लोकभावना व्यक्त झाली होती. दरम्यान, आज भारतरत्न डॉ. आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या विश्वस्तांनी पत्रकार परिषदेत घेऊन आपली निर्णायक भूमिका मांडली. गेल्या दोन वर्षापासून  डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीचे दोन मार्ग सुरू झाले होते. त्यासाठी प्रशासनाने परवाने दिले असल्याचा आरोपही करण्यात आला.

काही मंडळांच्या मनमानी पणामुळे अनेक मंडळांना आपली मिरवणूक पुढे जाता येत नसल्याच्या तक्रारी होत्या. यामुळे मंगळवारी मिरवणूक काढण्याचा प्राथमिक निर्णय घ्यावा लागला होता. काही मंडळांच्या मी पणामुळे इतर मंडळांच्या मिरवणुका पुढे जाण्यात अडथळा निर्माण होत होता. एकाच ठिकाणी काही मंडळे तळ ठोकून थांबत होती. यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. या सह विविध बाबी आणि अडचणी पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास समितीने आणून दिल्या. त्यावर सकारात्मक चर्चा झाली. एकाच ठिकाणी अधिक वेळ थांबणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

        आता एक मार्ग एक परवाना तोही पारंपारिक मार्ग राहणार आहे. प्रत्येक मंडळास पंधरा मिनिटाची समान संधी प्रत्येक चौकात देण्यात येणार आहे. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता ही मिरवणूक सुरू करण्यात येणार आहे. मंत्री अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफाही मिरवणूक मार्गात आणला जाणार नाही. अभिवादनासाठी संबंधित मान्यवर पायी चालत येतील यावरही सकारात्मक चर्चा झाली आहे. शहरात मरीआई चौक, श्री सिद्धेश्वर मंदिर मार्गे आणि डफरीन चौक मार्गे येणाऱ्या प्रत्येकी एक एक मंडळास डॉ. आंबेडकर चौकातून पुढे जाता येईल असे नियोजन करण्यात येत आहे. यामुळे प्रत्येकाला समान संधी मिळणार आहे.

        या पत्रकार परिषदेस विश्वस्त सुबोध वाघमोडे, ॲड. संजीव सदाफुले, प्रवीण निकाळजे, के.डी. कांबळे, राजा कदम, शशिकांत कांबळे, अरुण भालेराव, उत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. लौकिक इंगळे, ॲड. विनीत गायकवाड, योगेश कांबळे, अजित गायकवाड, सुग्रीव जेटीथोर, शिवम सोनकांबळे, पृथ्वीजित सरवदे, प्रबुद्धकुमार दोड्यानूर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

      दरम्यान, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पुतळा परिसरात उभारण्यात येणाऱ्या मंडपाचे पूजन या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव विश्वस्त समितीच्या वतीने करण्यात आले.

एकूण 485 मंडळांपैकी 210 मंडळ काढणार मिरवणूक 

भीम जयंती उत्सवामध्ये एकूण 485 मंडळे आहेत. त्यापैकी 210 मंडळांकडून मिरवणूक काढण्यात येते. पूर्वी बैलगाड्यांमधून मिरवणूक काढण्यात येत होती. आता तो प्रवास कंटेनर पर्यंत पोहोचला आहे. 13 एप्रिलच्या मध्यरात्री बारा वाजता विविध मंडळाकडून प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानंतर रविवार दि. 19 एप्रिल रोजी भव्य अशी मिरवणूक पारंपरिक मार्गावरून शहरात काढण्यात येणार आहे. सर्व मंडळांनी वेळेत आपल्या मिरवणुका सुरू कराव्यात, असे आवाहन विश्वस्त राजाभाऊ सरवदे , राजाभाऊ इंगळे, सुबोध वाघमोडे यांनी केले आहे.

मिरवणुकीचा पारंपारिक मार्ग राहणार असा –

पार्क स्टेडियम जवळील  विश्वभूषण  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास सकाळी पुष्पहार अर्पण करून व सामुदायिक बुध्दवंदना घेऊन भव्य मिरवणुकीस रविवारी सकाळी 11.30 वाजता सुरुवात करण्यात येणार आहे. ही मिरवणूक डफरीन चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक, वाडिया हॉस्पीटल, चांदणी चौक, महापौर निवास, स्टेशन चौक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, सुपर मार्केट, मेकॅनिक चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक, सोन्या मारुती चौक, मधला मारुती, मंगळवार पेठ, चाटी गल्ली, बाळीवेस, तरटी नाका पोलिस चौकी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बुधवार पेठ, मिलिंद नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थीविहार प्रेरणाभूमीसमोर पंचाची चावडी येथे मिरवणूकीची सांगता होईल.

Post Views: 17
Previous Post

शालेय राष्ट्रीय रग्बी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ भुवनेश्वरकडे रवाना

Next Post

ग्रामसेवकांच्या बनावट सह्यांनी लाखोंचा खेळ? मोठा गैरप्रकार उघड – राजाभाऊ राऊत!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
ग्रामसेवकांच्या बनावट सह्यांनी लाखोंचा खेळ? मोठा गैरप्रकार उघड – राजाभाऊ राऊत!

ग्रामसेवकांच्या बनावट सह्यांनी लाखोंचा खेळ? मोठा गैरप्रकार उघड - राजाभाऊ राऊत!

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रम साजरा

April 11, 2026

हिंगोलीत 4.7 रिश्टर भूकंप

April 11, 2026

मंठा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

April 11, 2026

चैन स्नॅचिंगचा गुन्हा ४८ तासांत उघड; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक

April 11, 2026

सावधान बाहेर जाताय घर नीट लॉक करा; नाहीतर चोरी होणारच

April 11, 2026

गाडी भाड्याने न दिल्याने महिलेवर प्राणघातक हल्ला

April 11, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 11, 2026

सोलापुरात गंमत बालनाट्य शिबिराचे आयोजन

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0802553

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697