जालना – तळणी (ता. मंठा) येथील दत्तराव मामा सरकटे यांची कन्या अयोध्या सरकटे हिची प्रतिष्ठित स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) या पदासाठी निवड झाली आहे.
अयोध्याने कठोर परिश्रम, चिकाटी आणि ध्येयदृष्टी यांच्या जोरावर हे यश मिळवत गावाचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून सर्व स्तरातून शिवभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



















