बार्शी – बॅन्डी असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित ७ वी राष्ट्रीय बॅन्डी(आईस हॉकी इनलाईन स्केटिंग) स्पर्धा २०२५ हिमाचल आईस रिंक डेहराडून उत्तराखंड येथे दि. ८, ९ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली.
या स्पर्धेत भारतातील सर्व राज्याचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत सुयश विद्यालय,बार्शीचा स्केटिंग खेळाडू कु.अथर्व विशाल उंदरे याने महाराष्ट्र राज्याच्या संघाचे प्रतिनिधित्व केले व महाराष्ट्र संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
तसेच त्याने त्याच्या कौशल्याच्या जोरावर उत्तम खेळाचे प्रदर्शन करत त्याची रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आईस हॉकी इनलाईन स्केटिंग कॅम्पसाठी निवड झाली. अथर्वने सुयश विद्यालय,बार्शीचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले.
या यशाबद्दल सुयश विद्यालयाचे संस्थापक शिवदास नलवडे, मार्गदर्शिका प्रतिभा नलवडे, प्रसाद नलवडे, मुख्याध्यापिका श्रीमती अलका जगताप, उपमुख्याध्यापक संदीप येवले, क्रीडाशिक्षक अतुल जाधव यांनी कौतुक केले. सुयश संकुलातर्फे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छ दिल्या.




















