सोलापूर – श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथील खेळाडूंची भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या आंतर विद्यापीठ स्तरीय अश्वमेध २०२५-२६ या स्पर्धेसाठी निवड झाली असून, यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या हॉलीबॉल (मुले) संघात अंतिम वर्षातील विद्यार्थी यश देशमुख आणि हॉलीबॉल मुलीच्या संघात अंतिम वर्षातील विद्यार्थिनी कु. सायली कुर्डे यांनी आपल्या दैदीप्यमान खेळाच्या जोरावर स्थान मिळवले आहे.
विद्यापीठाच्या बास्केटबॉल (मुली) च्या संघामध्ये तृतीय वर्षातील कु. गीतांजली शिंदे या विद्यार्थिनीची निवड झाली आहे. प्रथम वर्षातील विद्यार्थिनी श्री महांगडे हिने विद्यापीठाच्या संघात अथलेटिक्स क्रीडा प्रकारात स्थान प्राप्त केले आहे. सदरील सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. संभाजी कोकाटे यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. सदरील खेळाडूंच्या निवडीबाबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाष बापू देशमुख, अध्यक्ष श्री. रोहन देशमुख, सचिव डॉ. अनिता ढोबळे, प्राचार्य डॉ. अमोल शिंदे आणि सर्व प्राध्यापक वृंद यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले.
महाविद्यालयात उपलब्ध असणाऱ्या विविध क्रीडा सुविधांचा सर्वच विद्यार्थ्यांनी सदर विद्यार्थ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या आवडत्या क्रीडा प्रकाराचा नियमित स्वरूपात सराव करून महाविद्यालयाचे तथा संस्थेचे नाव उज्वल करावे अशी सदिच्छा देखील सर्वांनी व्यक्त केली.

























