जेऊर – येथील सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांची स्वामी रामदेव बाबा यांच्या सानिध्यात हरिद्वार येथे होणाऱ्या मुख्य योग प्रशिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यातून एकमेव निवड करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण एक सप्ताहचे असून येत्या पाच डिसेंबर पासून सुरू होणार आहे.
प्राचार्य नरारे यांची निवड ही राज्य युवा प्रभारी माननीय श्री प्रितेश जी लाड यांच्या मार्गदर्शनाखाली भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी सुरेंद्र जी पिसे, जिल्हा संवाद प्रभारी मधुकरजी सुतार, किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी भगवान जी बनसोडे, कोषाध्यक्ष रघुनंदन जी भुतडा, जिल्हा सहप्रभारी संतोषजी दुधाळ यांनी केली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यातच नरारे यांची भारत स्वाभिमान तालुका प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
करमाळा येथील ध्यान योग साधना व सेवा केंद्राचे नरारे हे मुख्य संचालक असुन दररोज पहाटे साडेपाच ते पावणे सात या वेळेत महिला व पुरुषांचा येथे योगा वर्ग मोफत घेतला जातो. या योग वर्गाच्या माध्यमातून विविध आजार बरे केले जातात. या निवडीबद्दल भाजप महिला मोर्चा च्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिगंबरराव बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव श्री विलासरावजी घुमरे, अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, प्राचार्य मिलिंद फंड यांनी विशेष अभिनंदन केले असून सर्वच स्तरातून नरारे यांचे अभिनंदन होत आहे.
























