देगलूर / नांदेड : देगलूर महाविद्यालयाने पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात आपली चमकदार छाप उमटवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील तुकाराम मट्टमवार, पवन रघुपतिवार, योगेश येरकलवार (व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी) तसेच रोहन गवळी, रविना गवळी आणि रीना गवळी (ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी) या प्रतिभावान खेळाडूंची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा महोत्सव संघात निवड झाली आहे.
दरम्यान दि. 4 ते 8 डिसेंबर 2025 दरम्यान नांदेड विद्यापीठात संपन्न झालेल्या 27 व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात या खेळाडूंनी विद्यापीठाचे यशस्वी प्रतिनिधित्व करून देगलूर महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. या खेळाडूंना क्रीडा संचालक डॉ. निरज उपलंचवार, प्रा. दिपक वावधाने आणि प्रा. सिताराम हाके यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कठोर परिश्रम, प्रशिक्षण आणि प्रोत्साहनामुळे या खेळाडूंनी राज्य पातळीवरील संघात स्थान पटकावले आहे.
या कामगिरीबद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, उपाध्यक्ष जनार्धन चिद्रावार, सचिव डॉ. कर्मवीर उनग्रतवार, सहसचिव राजकुमार महाजन, कोषाध्यक्ष विलास तोटावार तसेच संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य देवेंद्र मोतेवार, सूर्यकांत नारलावार, गंगाधरराव जोशी, रविंद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, गुरुराज चिद्रावार, विजय उनग्रतवार, सुभाषराव सांगवीकर यांनी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ, उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, प्रा. एम.एम. चमकुडे, डॉ. व्ही.जी. शेरिकर, पर्यवेक्षक श्री संग्राम पाटील, कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी तसेच सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. देगलूर महाविद्यालयातील या उज्वल यशामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेला नवी ऊर्जा मिळाली आहे.

























