वेळापूर – पळसदेव इंदापूर येथे झालेल्या पुणे विभागीय स्पर्धेत १९ वर्ष वयोगट मुली शालेय खो-खो स्पर्धेत वेळापूर तालुका माळशिरस येथील इंग्लिश स्कूल वेळापूर अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ वेळापूर संघाने स्पर्धेत सर्व सामने डावाच्या फरकाने जिंकून नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हा संघ पात्र ठरला आहे.
यशस्वी खेळाडूंना क्रिडाशिक्षक सतीश कदम, शिवाजी जाधव, सोमनाथ बनसोडे, अर्धनारी नटेश्वर क्रिडामंडळाचे अध्यक्ष जावेद मुलाणी, वेळापूर सरपंच रजनिश बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे
संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम , संस्थेच्या संचालिका डॉ. सौ मीनाक्षी कदम, सचिवा डॉ. सौ. प्रियदर्शनी महाडिक, संचालिका सौ. तेजस्विनी कदम, शाळा समिती चेअरमन प्रतापराव पाटील, प्राचार्य आर बी पवार , उपमुख्याध्यापक पठान शिवशरण , पर्यवेक्षक सावळे बी एस, जावेद आतार,ग्रामपंचात सदस्य संजय मंडले, भय्या चंदनशिव, भय्या कोडग, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अमोल मंडलिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप जगदाळे, उपाध्यक्ष प्रियंका पोरे, संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, माजी खेळाडू, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
















