धाराशिव / खामसवाडी – राज्याच्या क्रीडा विभागामार्फत घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत कळंब तालुक्यातील खामसवाडीच्या जिल्हा परिषद शाळेच्या पाच विद्यार्थिनीची निवड झाली आहे.चिपळूण येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या विद्यार्थिनीचा संघ लातूर विभागाचे नेतृत्व करणार आहे.
यामध्ये ट्रिपल जंप प्रकारात सई सुनील शेळके ही विद्यार्थिनी विभागात दुसरी आली असून असून ती लातूर विभागाचे नेतृत्व करणार आहे. दुसरा क्रीडा प्रकार 4400 रिले यात खामसवाडीच्या जिल्हा परिषद शाळेच्या मुलींनी धाराशिव जिल्ह्याचे नेत्रत्व करीत लातूर विभागात प्रथम क्रमांक मिळविला.यामध्ये सानवी विशाल शेळके, सई सुनील शेळके, अमृता शांतलिंग लोखंडे, दीपिका विठ्ठल जोशी या खेळाडूंचा समावेश होता.
सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे व क्रीडा शिक्षक गणेश करंजकर यांचे गावचे सरपंच अमोल पाटील, उपसरपंच दयानंद पाटील, गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पवार सर, शालेय समिती अध्यक्ष राम शेळके यांनी अभिनंदन केले. सदरील विद्यार्थिनी खेळाडूंचा सहपालक शाळेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.गावातून तसेच सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





















